फणसाच्या खरेदीसाठी नाही सेल्फी काढण्यासाठी लोकांची गर्दी

fanas1
इंडोनेशियाचा जावा बेटावरील तासिकमाला सुपरमार्केट मध्ये सध्या फणस हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे. हा फणस दुर्लभ जातीचा असल्याचे विक्रेत्याचे म्हणणे आहे. जे क्वीन नावाने हे फणस सुपरमार्केट मध्ये विक्रीसाठी आले आहेत आणि एका फणसाची किंमत आहे १ हजार डॉलर म्हणजे ७११३५ रुपये.

ज्या भागात हे सुपरमार्केट आहे तेथील नागरिकांचे महिन्याचे सरासरी उत्पन्न आहे १३ हजार रुपये. त्यामुळे हा फणस खरेदी कोण करणार असा प्रश्न आहेच. लोक या फणसाची कीर्ती ऐकून सुपरमार्केट मध्ये गर्दी करत आहेत पण ती फणस खरेदीसाठी नसून फणस पाहण्यासठी आणि सेल्फी घेण्यासाठी आहे.

fanas
या फणसाच्या मालकाचा असा दावा आहे कि फणसाची ही जात फक्त त्याच्याकडेच आहे. तो म्हणतो या झाडाला तीन वर्षात फणस लागतात आणि एकावेळी एका झाडाला २० पेक्षा जास्त फणस येत नाहीत. या बाबत अन्य शेतकऱ्यांचे मत थोडे वेगळे आहे. ते म्हणतात ही जात कधी ऐकली नाही. सर्वात दुर्मिळ फणस कुम्बोकर्ण नावाने ओळखला जातो. तो उत्तम दर्जाचा असतो पण त्याचे पिक खूपच कमी येते.

Leave a Comment