७ अब्ज रुपयांचे जगातील सर्वाधिक मोठे मशीन

mashine
बॅगर २८८ या नावाने खाणकाम करण्यासाठी बनविले गेलेले मशीन जगातील अजस्त्र मशीन होते आणि ते तयार करण्यासाठी ७ अब्ज रुपये खर्च केले गेले होते. अतिप्रचंड आकाराचा डायनासोर भासेल तसे हे राक्षसी मशीन ४० हजार मजुरांचे काम एकट्याने पार पाडत असे. उत्तम इंजिनिअरींगचचा हा नमुना होता. जर्मनीतील हम्बाख जंगलाचा प्रचंड मोठा भाग या मशीनमुले उजाड झाला होता.

हे मशीन जर्मन कंपनी क्रुपने जमिनीतून कोळसा बाहेर काढण्यासाठी १९७८ साली बनविले होते. हे त्यावेळे सर्वात जड आणि प्रचंड मोठे मायनिंग मशीन म्हणून ओळखले जात होते. त्याची किंमत होती १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७ अब्ज रुपये. या मशीनचे सुटे भाग बनविण्यासाठी ५ वर्षे लागली आणि ते जोडण्यासाठी आणखी ५ वर्षे गेली. ते २२५ मीटर उंच, ९६ मीटर लांब आणि १३ हजार टन वजनाचे होते.

machine1
या मशिनच्या सहाय्याने हम्बाख जंगलातून रोज २,४०,००० टन कोळसा बाहेर काढला जात होता. हे मशीन इतके अवजड होते कि एक तासात ते जेमतेम १०० ते ६०० मीटर अंतर कापत असे आणि ते चालविण्यासाठी ५ माणसे लागत. हे मशीन विजेवर चालत असे आणि त्यासाठी १६.५६ मेगावॉट वीज लागे.

२००१ साली ते हम्बाख जंगलातून बाहेर काढले गेले तेव्हा त्यासाठी दीड कोटी मार्क खर्च आला. तुकडे करून ते बाहेर काढावे लागले आणि त्यासाठी ३ आठवडे ७० कर्मचारी काम करत होते.

Leave a Comment