मोबाईल फोन आता केवळ स्मार्ट नव्हे तर ओव्हरस्मार्ट बनणार आहेत. एमआयटी कॉलेज मधील संशोधकानी केलेले संशोधन त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. या संशोधकांनी असा एक पदार्थ शोधला आहे, ज्यामुळे वायफाय कनेक्टेड स्मार्टफोन स्वतःच चार्ज होऊ शकतील. म्हणजे ते चार्ज करण्याची गरज उरणार नाही.
वायफाय कनेक्टेड स्मार्टफोन स्वतःच होणार चार्ज
हे एक प्रकारची रेडीओ अन्टेना आहे. एका नव्या प्रकारच्या सेमीकंडक्टर पदार्थापासून ती बनविली गेली आहे. रेक्टीना असे तिचे नामकरण केले गेले आहे. ही अन्टेना वायफाय सिग्नल कॅच करून त्याचे रुपांतर वायरलेस ऊर्जेमध्ये करते. या पद्धतीने लॅपटॉप सुद्धा चार्ज करता येणार आहेत. त्यामुळे भविष्यात मोबाईल फोन आणि लॅपटॉपचे स्वरूप बदलेलच पण फ्रीज, टीव्ही आणि इलेक्ट्रिकवर चालणारी उपकरणे यांनाही अशी वायरलेस पॉवर सुविधा देता येईल असा दावा केला जात आहे.