भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड संघात दोन नवे भिडू

newzeland
नेपियर – भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. संघ व्यवस्थापनाने एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर संघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पहिल्यांदाच अष्टपैलू डॅरिल मिचले आणि वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. टी-२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना वेल्गिंटन येथे खेळला जाईल.

सुपर स्मॅस अभियान आणि न्यूझीलंडच्या ‘अ’ संघातून खेळताना मिचेलने दर्जदार प्रदर्शन केले आहे. तर टिकलर याची फर्ग्यूसनच्या जागी निवड झाली आहे. तो तिसऱ्या सामन्यात संघासोबत राहिल. लोकी फर्ग्यूसनची पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी निवड झाली आहे. डग ब्रेसवेल याला दुखापतग्रस्त जिमी निशाम यांला पर्याय म्हणून निवड करण्यात आले आहे. नवे खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी आशा निवड समितीचे अध्यक्ष गाविन लार्सन यांनी व्यक्त केली आहे. संघाचे नेतृत्व केन विलियमसन यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा टी-२० संघ – केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रँडहोम, लोकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुजेजिन, डॅरिल मिचेल, कॉलिन मुनरो, मिचेल सँटनर, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), इश सोढी, टिम साउदी, रॉस टेलर आणि ब्येलर टिकनर.

Leave a Comment