पास्ता खाल्याने तरुणाचा झाला मृत्यू

pasta
वॉशिंग्टन – पास्ता खाल्यामुळे एका 20 वर्षांचा विद्यार्थी एजेचा मृत्यु झाला आहे. ‘यूएस जर्नल ऑफ क्लिनिकल माइक्रोबायोलॉजी’ मध्ये ही घटना प्रसिध्द झाली होते.

एजेने 5 दिवस शिळा पास्ता खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना 2008 चे आहे. एजेने पास्ता बनवला होता. त्याने थोडा खाऊन किचनमध्ये ठेवून दिला. जवळपास दोन दिवस पास्ता किचनमध्येच राहिला. दोन दिवसांनंतर एजेच्या रुममेटने थोडासा पास्ता खाऊन फ्रिजमध्ये ठेवला. पास्ता जवळपास तीन दिवस फ्रिजमध्ये राहिला. पाच दिवसांनंतर एजेने तोच पास्ता फ्रिजमधून काढून गरम केला आणि खाल्ला. हा पास्ता पाच दिवसांपुर्वीचा आहे याची त्याला कल्पना नव्हती. एजेने पास्ता खाल्ल्यानंतर आजारी पडला. त्याला डोकेदुखी, पोटदुखी आणि मळमळ होऊ लागली. त्याने उल्टी करणे सुरु केले. त्याला वाटले की, फूड पॉइजनिंग झाले आहे. त्याने खुप पाणी प्यायले आणि औषधे घेतले. तो झोपेतून उठला तेव्हा त्याला खुप घाम आलेला होता. त्यानंतर त्याला चक्कर आली.

एजेची प्रकृती खालावतेय हे पाहून त्याच्या रुममेटने एम्बुलेंस बोलावली. हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत एजेचा मृत्यू झाला. पोस्ट मार्टममध्ये समोर आले की, फूड पॉइजनिंगमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात शिळ्या पास्ताचे अंश मिळाले होते. डॉक्टरांनी सांगितले की, पास्तामध्ये विषारी जिवाणू तयार झाले होते. यामुळे उल्टी आणि डायरिया होतो. यासोबतच त्याच्या पोटातून स्टमक मेडिसन मिळाली, यामुळे तो जास्त आजारी झाला आणि बॉडीवर त्याचा उलट प्रभाव पडला. यामुळे त्याचे लिव्हर डॅमेज झाले.

Leave a Comment