नासाच्या क्यूरियोसिटी रोवरने मंगळ ग्रहावर घेतला शेवटचा सेल्फी 

curiosity
वॉशिंग्टन –  नासाच्या क्यूरियोसिटी रोवरने  मंगळ ग्रहावर शेवटचा सेल्फी घेतला आहे.  क्यूरियोसिटी रोवर मंगळ ग्रहावर एक वर्षापेक्षा जास्त काळ संशोधन करीत आहे. अमेरिकेच्या अंतरिक्ष एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे.
वेरा रुबिन रिजपासून नवीन महिती गोळा केल्यानंतर कारच्या आकारा सारखा हा रोवर आता माउंट शार्पच्या एका माती सारख्या क्षेत्रामध्ये उतरणार आहे.
गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी क्यूरियोसिटी रोवरने रॉक हॉल नावाच्या रिजच्या एका ठिकाणी 19 वा नमुने घेतले होते. 15 जानेवारी रोजी स्पेस शटलने मार्स हैंड लेंस इमेजर कॅमेऱ्याचा वापरुन 57 फोटो घेतले होते, या सोबत एक सेल्फी देखील घेण्यात आला होती.

Leave a Comment