बहुगुणकारी ताडगोळे

ice-apple
ताडगोळे हे फळ वर्षामध्ये ठराविक ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणारे फळ आहे. याची चव काहीशी शहाळ्यातील मलई प्रमाणे लागत असून, चवीला हे फळ मधुर असते. इंग्रजी भाषेमध्ये ‘आईस अॅपल’ या नावाने ओळखले जाणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय गुणकारी असल्याचे म्हटले जाते. या फळाला मुंजाल या नावानेही काही प्रांतांमध्ये ओळखले जाते. या फळाचे आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून घेऊ या.
ice-apple1
ज्यांना वजन घटवायचे असेल, त्यांच्यासाठी या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळाच्या गरामुळे आणि यामध्ये असलेल्या रसामुळे भूक शमण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार काही ना काही खाण्याची इच्छा होत नाही. ज्यांना लिव्हरशी निगडित काही समस्या असतील त्यांच्यासाठी देखील या फळाचे सेवन उपयुक्त आहे. या फळामध्ये पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये असून त्यामुळे लिव्हरमध्ये साठलेले घातक, विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. या फळाच्या सेवनामुळे शरीराला श्रम करण्यासाठी आवश्यक ताकद आणि उर्जा मिळत असते. या फळाच्या सेवनामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत असल्यामुळे दिवसभराच्या कामासाठी लागणारी ताकद या फळाच्या सेवनाने मिळत असते.
ice-apple2
या फळाच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेले क्षार आणि इतर पोषक तत्वे संतुलित मात्रेमध्ये मिळत असतात. ज्यांना त्वचेवर उन्हाळ्यामुळे सतत पुरळ येत असेल, किंवा ज्यांना या दिवसांमध्ये चेहऱ्यावर सतत मुरुमे येत असतील त्यांच्यासाठी देखील या फळाचे सेवन उत्तम आहे. या फळामध्ये कर्करोगप्रतिरोधी तत्वे असून, विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी या फळाचे सेवन उत्तम मानले गेले आहे. या फळामध्ये अँथोसायनिन नामक फायटोकेमिकल स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करणारे आहे. आरोग्यासाठी या फळाचे फायदे पुरेपूर मिळविण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या फळाचे भरपूर सेवन करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment