कपिल देव यांचा विक्रम २१ वर्षीय दीप्ती शर्माने मोडला

deepti-sharma
हॅमिल्टन – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक छोटे मोठे विक्रम भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी केले आहेत. पण त्यांनी असा विचार कधीच केला नसेल की २१ वर्षीय महिला खेळाडू त्यांचा एक विक्रम मोडेल. ती महिला खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून अष्टपैलू खेळाडू दीप्ति शर्मा आहे.

भारतीय संघात उत्तरप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणारी ही खेळाडू फिरकी गोलंदाज म्हणून खेळत आहे. तिने मंगळवारी झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत एक नवा विक्रम केला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने २७ धावात २ गडी बाद केले. तर दुसऱ्या सामन्यात ५१ धावात २ गडी टिपले. तर फलंदाजीत पहिल्या सामन्यात तिला भोपळाही फोडता आला नाही. दुसऱ्या वनडेत मात्र, ८ धावा केल्या. पण तिने याच सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा आणि ५० बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

४३ एकदिवसीय सामन्यात शर्माने हा कारनामा केला आहे. हा कारनामा भारतीय पुरुष क्रिकेट संघातील इतर कोणत्याही खेळाडूला करता आला नाही. या विक्रमासोबतच माजी कर्णधार कपिल देव यांनादेखील शर्माने पाठीमागे टाकले आहे. त्यांनी हा विक्रम ४६ सामन्यात केला होता. आतापर्यंत १४ भारतीय क्रिकेटपटूंनी हा कारनामा केला आहे. भारतीय पुरुष संघाने मालितेत ३-० अशी विजयी आघाडी तर मंगळवारी मिताली राजच्या संघाने न्यूझीलंडमध्ये २-० अशी मजबूत आघाडी घेतली आहे. दोन्ही संघ मालिकेत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा विचार करत असेल.

Leave a Comment