या कारणाने आमिर आणि जुहीमध्ये होता सात वर्षे अबोला!

amir-khan
अनेक हिट चित्रपटात आमिर खान व जुही चावला या जोडीने काम केले आहे. या जोडीने ‘कयामत से कयामत तक’ पासून ‘इश्क’पर्यंत लोकांना वेड लावले. मात्र ही जोडी ‘इश्क’नंतर कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद असून एकेकाळी जुही व आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण एक वेळ अशी आली की, आमिर व जुही दोघांनीही एकमेकांशी सहा-सात वर्षे अबोला धरला. अलीकडेच खुद्द आमिरने ही माहिती एका मुलाखतीत दिली.

या दरम्यान आमिरने ‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा सांगितला. आमिर या सेटवर अनेकदा जुहीची मजा घेत, तिच्यासोबत प्रैंक करायचा. आमिरला ही सवयच होती. त्याला आपल्या सहकलाकारांची फजिती करताना मज्जा यायची. आमिरने एकदा मला भविष्य कळते, असे म्हणून जुहीचा हात पाहायचा म्हणून तिला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. जुही या प्रकारानंतर एवढी खवळली की तिने आमिरशी बोलणेच बंद केले. अर्थात ‘इश्क’च्या शूटींगवर या वादाचा दोघांनीही परिणाम होऊ दिला नाही.

आमिरही ताज्या मुलाखतीत यावर बोलला. माझ्यात व जुहीत ‘इश्क’च्या सेटवर क्षुल्लक वाद झाला होता. मी यानंतर तिच्याशी कधीच न बोलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी असे का वागलो, ते मला आजही कळत नाही. या भांडणातच आम्ही ‘इश्क’चे शूटींग पूर्ण केले. आमचा अबोला पुढे सहा-सात वर्षे कायम होता. यानंतर सात वर्षांनंतर मला जुहीचा अचानक एकेदिवशी फोन आला. तिचा मी फोन घेणार नाही, हे तिला ठाऊक होते. पण तरिही तिने मला फोन केला. मी फोन घेतला. यानंतर मला तुला भेटायचे आहे, असे जुही मला म्हणाली. मी व रिना घटस्फोट घेत असल्याचे जुहीला कळले होते. तिला मला यासंदर्भात भेटायचे होते. मला ती भेटली. मला तिने खूप समजावले. आमचा संसार वाचवण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले. आज मी जुही एकमेकांशी फार बोलत नाही. पण आमच्यात अबोला नाही. आमची मैत्री आजही कायम असल्याचे आमिरने सांगितले.

Leave a Comment