सिल्क सिटी भागलपूरची आणखी काही वैशिष्टे

bhagalpur
बिहारमधील सिल्क सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले भागलपूर अन्य काही कारणांनी तितकेच प्रसिद्ध आहे. बिहार हा पर्यटनाच्या दृष्टीने थोडे मागासलेले राज्य असले तरी भागलपूरला कधी गेलात तर या ठिकाणांना भेट देणे विसरू नका.

silk
येथील सिल्क जगात प्रसिद्ध असून सिल्क सध्या, कपडे आणि कपडा फारच खास असतो. त्याचबरोबर भागलपूर गेली १५० वर्षे होत असलेले रामलीला उत्सव आणि दुर्गा पूजा आवर्जून अनुभवावी असे आहेत. येथे सुमारे १०० हून अधिक दुर्गा प्रतिमा पंडाल उभे केले जातात. गंगाकिनारी वसलेले भागलपूर धार्मिक शहर म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच ते सिनेमा जगातही फेमस आहे.

बॉलीवूड मधील अशोककुमार, किशोरकुमार यांचे हे आजोळ, तसेच बंगाली लेखक शरदचंद्र चटर्जी यांचे हे गाव. त्याच्या देवदास या गाजलेल्या चित्रपटातील पारो त्यांना त्यांच्या बालमैत्रीण धीरु वरून सुचली तर चंद्रमुखी त्यावेळची प्रसिद्ध नर्तिका कालिदासी हिच्यावरून सुचली असे सांगितले जाते.

balushahi
भागलपूर स्ट्रीटफूड साठीही प्रसिद्ध आहे. येथील चाट, मुडी, पाणीपुरी, लीत्ती चोखा खावाच पण त्याचबरोबर बालुशाही अवश्य खावी. हे गाव मुळची अंग राज्याची राजधानी. आंब्याच्या दिवसात येथे गेलात तर जर्दाळू आंबे खायला हवेतच, मधासारखा हा गोड आंबा वेगळाच आहे. शिवाय केली, लीची ही फळे आवर्जून खावीत.

येथील गंगेवरचा पूल अतिशय सुंदर असून कप्पा घाट येथील गुहा, तसेच प्राचीन राधाकृष्ण मंदिर, गंगेच्या मधेच छोट्याश्या पहाडावर असलेले अजगैबीनाथ मंदिर हि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Leave a Comment