राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचा फेरफटका

mughal
दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन स्थानिक पातळीवरच नव्हे तर देशविदेशातही प्रसिद्ध असून हे गार्डन खुले होण्याची प्रतीक्षा आता संपुष्टात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा हे गार्डन ६ फेब्रुवारी ते १० मार्च या काळात सर्वसामान्य नागरिकांना, पर्यटकांना पाहण्यासाठी खुले होत आहे. जगभरातील विविध जातीची, रंगीबेरंगी फुले, झाडे, बोन्साय येथे पाहायला मिळतात. राष्ट्रपती भवनात १३ एकर जागेत हे उद्यान आहे.

circle
मुघल आणि ब्रिटीश स्थापत्य शैलीचा हा उत्तम नमुना समजाला जातो. ब्रिटीश मुघल शैलीतील झरे, कारंजी आणि अन्य कलाकृती येथे आहेत. या उद्यानात मोफत प्रवेश दिला जातो आणि त्याची वेळ आहे सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यत. सोमवारी ते बंद असते.

tulips
या उद्यानाची रचना चार भागात केली गेली आहे. चतुर्भूजाकार, लांब, पडदा उद्यान आणि वर्तुळाकार उद्यान. येथे ३ हजार प्रकारची फुले असून त्यात फक्त गुलाबच १३५ जातींचे आहेत. तेहतीस प्रकारच्या वनौषधी, ३०० प्रकारची बोन्साय आहेत. महान वास्तुकार एडविन लँडसियर लुतीयन्स यांनी या उद्यानाचे डिझाईन केले आहे. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी हे उद्यान आम जनतेसाठी खुले करण्याची प्रथा सुरु केली होती.

Leave a Comment