किम जोंग उनने लाँच केले खाता येणारे कपडे

kapade
उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन याने काही फॅशन उत्पादने नुकतीच लाँच केली असून त्यात भूक लागल्यास खाता येतील असे कपडे आहेत. त्याचबरोबर स्विमिंग, हायकिंग आणि साहसी खेळासाठी आवश्यक असे अॅपरल्सही आहेत.

खाता येतील असे विशेष कपडे किम क्लोदिंग रिसर्च सेंटरने तयार केले असून हे कापड फलेनलेट फॅब्रिक म्हणून ओळखले जाते. ते प्रोटीन्स, अमायनो, फ्रुट ज्यूस, आयर्न, कॅल्शियमपासून तयार केले जाते. त्यात पुरुषांसाठी जॅकेट बनविली गेली आहेत. महिलांसाठी शॅनल कंपनी डिझायनर वॉर्डरोब ची नक्कल केलेले कपडे आणि गुची या प्रसिद्ध हँडबॅगची नक्कल केलेल्या पर्सेस आहेत. खाता येणारे कपडे स्मार्ट क्लोदिंग नावाने विकले जाणार आहेत. महिलांसाठी सादर झालेली उत्पादने १९९० च्या काळातील फॅशन प्रमाणे असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment