७५ वर्षीय सेल्वाम्माचा घ्या आदर्श

selvamma
पावसाला आला कि शेगडीवर रस्त्याकडेला भाजली जाणारी गरमागरम मक्याची कणसे आपण नेहमीच खातो. बंगलोर येथे गेली २० वर्षे अशी भाजलेली कणसे विकून प्रपंच चालविणारी ७५ वर्षीय सेल्वाम्मा हिने या बाबत एक आदर्श घालून दिला आहे. कोणत्याची बदलाची सुरवात प्रथम छोट्या प्रमाणावर कशी होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सेल्वाम्माची हातगाडी.

कणसे कोळशावर भाजताना धूर होतो शिवाय प्रदूषण होते. सेल्वाम्माने तिच्या गाडीवर एक सोलर पॅनल बसवून नवा मार्ग काढला आहे. एका स्वयंसेवी संस्थने तिला हे सोलर पॅनल दिले आहे. त्यावर सेल्वाम्मा एक छोटा पंखा चालविते. त्यामुळे कोळसे कमी वेळात पूर्ण जाळण्यास मदत होते, कणसे लवकर भाजली जातात, धूर कमी होतो आणि सेल्वाम्माच्या खर्चात बचतही होते. त्यामुळे कमी मेहनतीत सेल्वामा जास्त कणसे भाजू शकते. प्रदूषण कमी करण्यात सेल्वाम्माने खारीचा वाटा नक्कीच उचलला आहे.