मर्सिडीज प्रमुखांना मिळणार महिना ८ कोटी पेन्शन

seche
दररोज बाजारात नवनवीन कार्स येत असल्या तरी आजही आपल्याकडे मर्सिडीज असावी असे अनेकांचे स्वप्न असते. या मर्सिडीजचे अध्यक्ष डिटर सेचे या वर्षअखेर निवृत्त होत असून त्यांना पेन्शन मिळणार आहे. हि पेन्शन महिना १०.५ लाख युरो म्हणजे ८,५४,२३,८३४ भारतीय रुपये असणार आहे. सेचे यांना इतकी पेन्शन देण्याचा निर्णय २०१७ सालीच झाला असून त्यांना हि पेन्शन २०२० पासून सुरु होणार आहे.

सेचे यांना पेन्शनशिवाय पेन्शन फंडातून दरवर्षी ५ लाख युरो वेगळे दिले जाणार आहेत. जर्मन कंपन्यांच्या इतिहासात सेचे देशातील सर्वाधिक पेन्शन घेणारे अध्यक्ष ठरले आहेत. त्यांना रोज ४२५० युरो म्हणजे ३ लाख ४४ हजार रु. मिळणार आहेत. शिवाय २०२१ मध्ये ते मर्सिडीजच्या बोर्डावर नियुक्त होतील त्यामुळे त्यांची कमाई वाढणार आहे. सेचे २००६ पासून बेंझचे प्रमुख आहेत. त्यांनी १९७६ साली डायल्मर कंपनी जॉईन केली होती. मर्सिडीज याच कंपनीची उपकंपनी आहे.

Leave a Comment