विवाहसोहळ्यानंतर अवघ्या काही मिनिटात मंडपातच झाला घटस्फोट

divorce
(छायाचित्र सौजन्य – अहमदाबाद मिरर)
गुजरातमधील गोंडल येथे एका विवाह सोहळ्या दरम्यान एक विचित्र प्रकार घडला असून येथे थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. पण त्यानंतर जेवणाच्या वेळी झालेल्या वादावादीनंतर काही मिनिटातच नवविवाहित दांपत्याने घटस्फोट घेतला आणि आपापल्या घरी रवाना झाले. दोन महिने आधी या दांपत्याने कोर्ट मॅरेज केले होते. यावेळी दोन्ही कुटुंब पारंपारिक पद्धतीने लग्न करण्यासाठी एकत्र आले. पण लग्न करण्यासाठी जमलेल्या मंडपातच भांडण झाल्यामुळे घटस्फोट झाला.

या लग्नातील वर हा अनिवासी भारतीय असून तो गुजरातमधील खेडा गावचा रहिवासी आहे. त्याची फेसबुकवरुन तरुणीशी भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. कोर्ट मॅरेज केल्यानंतर 25 जानेवारीला नवरामुलगा वरात घेऊन गोंडलला पोहोचला होता. मुलीच्या कुटुंबीयांनीही यावेळी त्यांचे जोरदार स्वागत केले. पण जेवणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले. यादरम्यान मंडपातच आपापल्या वकिलांना दोन्ही कुटुंबांनी बोलावले आणि घटस्फोट करुन दिला. कोणीतरी पोलिसांना मंडपात उडालेला गोंधळ पाहून कळवले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर गोंधळ थांबला पण नाराजी कायम होती. आपापले वकील दोन्ही पक्षांनी बोलावून घटस्फोट घडवून आणला. दोन्ही पक्षांनी यावेळी एकमेकांना देण्यात आलेल्या भेटवस्तूही परत केल्या.

Leave a Comment