प्रजासत्ताक दिन समारोहाची ‘बिटींग रिट्रीट’ने होणार सांगता

republic-day
नवी दिल्ली – आज रायसीना हिल्स येथे बिटींग रिट्रीट समारोहाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिन समारोहाची या कार्यक्रमानंतर औपचारीक सांगता होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

बिटींग रिट्रीटचा सराव समोरापाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रजासत्ताक दिन समारोहाच्या समारोपाला आयोजन करण्याची जुनी पद्धत आहे. भारतीय सेना या कार्यक्रमात आपल्या शक्ती आणि संस्कृतीचे प्रदर्शन करते. यात २७ प्रकारचे कार्यक्रम होतील.

१९५०साली भारतात बिटींग द रिट्रीटची सुरुवात झाली. हा कार्यक्रम एवढ्या वर्षांमध्ये दोन वेळा रद्द करण्यात आला. पहिल्यांदा २००१ साली गुजरात भूकंपावेळी आणि दुस-यांदा राष्ट्रपती वेंकटरमन यांचे निधन झाले त्यावर्षी म्हणजेच २००९ साली रद्द करण्यात आला आहे. सोमवारी दिल्लीकरांना बिटींग रिट्रिटच्या सरावामुळे गैरसोय सहन करावी लागली. दिल्लीतील रस्त्यांमध्ये यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सोमवार दुपारी साडे तीन पासून रात्री नऊ वाजेपर्यंत विजय चौक येथील वाहतूक बंद करण्यात आली होती.

Leave a Comment