आयसीसीने जाहिर केला टी-२० विश्वचषकाचा कार्यक्रम; २४ ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना

ICC
दुबई – सातव्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० चा कार्यक्रम आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने मंगळवारी घोषित केला आहे. महिला आणि पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियातील ८ शहरातील १३ मैदानावर पार पडणार आहे.


१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान चालणारी पुरुषांची स्पर्धा खेळविली जाईल. तर, २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान महिला गटाचे सामने होणार आहे. अंतिम सामना ८ मार्चला होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेत थेट प्रवेश मिळविणाऱ्या ८ संघाची नावे या आधीच घोषित केली आहे. पण एक वेळा विजेता आणि ३ वेळा उप विजेता ठरलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश यांना पात्रात फेरीचे सामने खेळावे लागणार आहे.

२४ ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ स्टेडियमला होणार आहे. तर भारतीय महिला संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी २१ फेब्रुवारीला होईल.

अ गटातील संघ – ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, भारत, अफगाणिस्तान, क्वालिफायर १
ब गटातील संघ – इंग्लंड, वेस्टइंडीज, दक्षिण अफ्रीका, पाकिस्तान, क्वालिफायर २

Leave a Comment