फेसबुक बनले आहे व्हर्च्युअल कब्रस्तान!

fb
नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकवर दररोज 8,000 लोकांचा मृत्यु होत आहे. या शतकाच्या अखेर पर्यंत सोशल मीडिया अग्रस्थानी असलेले फेसबुक सर्वात व्हर्च्युअल कब्रस्तान असेल. कारण फेसबुकवर जिवंत लोकांपेक्षा जास्त मृत लोकांची प्रोफाईल जास्त प्रमाणत असणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी फेसबुक असे एक माध्यम आहे ज्याचा वापर कोटींच्या संख्येत युझर्स वापरत करतात. त्यापाठोपाठ युजर्स ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, स्नैपचैट, रेडिट आदी अॅपचा वापर करत आहे.

फेसबुकवर तब्बल 2 अब्ज युजर्स आहेत, व्हाट्सअॅपचे 1.5 अब्ज युजर्स आहेत, इन्स्टाग्रामचे 1 अब्ज आहेत आणि ट्विटरचे 33.6 कोटी युजर्स आहेत, यातील लाखो युजर्स हे एकट्या भारतात आहेत.

आपल्या मृत्यू नंतर आपल्या डिजिटल खात्यांचे काय नेमक काय होईल याचा आता विचार करुया. डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणा-याच्या मृत्यूनंतर हा मोठा प्रश्न असतो की, त्याच्या अकाउंटवरील फोटो, व्हिडीओ आणि मित्रांच्या पोस्ट्स तसेच डिजिटल प्रोफाईल त्यांच्या कुटुंबाला याविषयी कशी माहिती मिळेल.

याबाबत माहिती देताना देशातील सर्वोच्च सायबर कायदा तज्ञ पवन दुग्गल म्हणाले की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यु होते आणि त्याच्या ई-मेल आणि सोशल मीडियावर अकाउंट असते, अशावेळी ते प्रोफाईल हस्तांतरित होउ शकते आणि त्या व्यक्तीच्या वारसदारांना ते प्रोफाईल चालविण्याची परवानगी मिळू शकते.

फेसबुक आपल्या युजर्सना एक वारसदार निवडण्याची परवानगी देते. त्यामुळे युजर्सच्या मृत्यूनंतर त्याचे खाते चालविण्यासाठी कुटुंबातील सदस्य किंवा एका मित्राची निवड करता येऊ शकते.

याबाबत फेसबुक म्हणते की, जेव्हा आम्हाला कोणीतरी सांगते की, एखाद्या युजर्सचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही त्याचे खाते संस्मरणीय ठेवतो. मृत्यु झालेल्या युजर्सचा जी व्यक्ती वारस असते त्या व्यक्तीला त्याच्या फेसबुकच्या टाइमलाइनवर एक पोस्ट लिहू शकतो. जर एखाद्याला ते पोस्ट आवडत असेल तर त्याला मृत व्यक्तीच्या खात्याचे फोटो, पोस्ट आणि प्रोफाइल माहिती डाउनलोड करण्यासाठी वारसदाराकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. वारसदार फेसबुकला सांगू शकता की, त्याचे खाते कायमचे डिलीट केले जावे. पण वारसदाराला मृत व्यक्तीच्या खात्याचे लॉग इन करता येणार नाही आणि त्याचे वैयक्तिक संदेश वाचूही शकणार नाही.

Leave a Comment