…म्हणून नव-वधूला धुवावे लागले 365 जोडी सॉक्स

c
बीजिंग – जेव्हा नव-वधू लग्न करुन सासरी येते तेव्हा नातेवाईक आणि इतर मित्र-मैत्रिणी भेट वस्तु देऊन तिचे स्वागत करतात, परंतु चीनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. चीनमध्ये एका तरुणीचे लग्न झाले आणि लग्नानंतर तिला चक्क 365 जोडी सॉक्स धुवावे लागले.

या तरुणीने गेल्या वर्षी तिच्या प्रियकराला वाढदिवसाच्या निमित्ताने 365 जोडी सॉक्स भेट म्हणून दिले होते. यावर्षी तरुणीने या प्रियकरासोबत लग्न केले, त्यानंतर तिला तिनेच भेट दिलेले 365 जोडी सॉक्स मिळाले.

या तरुणीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने म्हटले आहे की, पतीने गेल्या वर्षभरात सॉक्सचा वापर करुन तसेच ठेवत होता. आता पर्यत एक ही सॉक्स त्याने धुतलेला नाही. त्यामुळे तिनेच हे सॉक्स धुण्याचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर दोन दिवसांत जवळजवळ 300 जोडी सॉक्सचे धुतले तरी 50 जोड्या सॉक्स धुणे अजूनही बाकी आहे. तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment