व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवे फिचर

whatsapp
आपल्या युझर्ससाठी व्हॉट्सअॅप हे नेहमीच काही ना काही नवी फिचर्स दरवेळेस आणत असते. यावेळी व्हॉट्सअॅपने संभाषण आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लवकरच ‘फिंगरप्रिंट लॉक’ हे नवे फिचर आणणार आहे. आपल्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही या फिचरमुळे व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

हे फिचर व्हॉट्सअॅपवरील संभाषण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आणण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक जण सध्या आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप लॉक करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात. पण व्हाट्सअॅपच्या या नवीन फिचरमुळे थर्ड पार्टी अ‌ॅप्स वापरण्याची गरज पडणार नाही. व्हॉट्सअॅपकडून यासोबतच इतरही काही फिचर्स आणली जाणार आहेत.

कंपनीकडून व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. पण आपला मोबाईल फोन अनेकदा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले व्हॉट्सअॅप मेसेजेस वाचले जाण्याची भिती अनेकांना असते. आता फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे परवानगी शिवाय व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे.

लवकरच व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड युजर्स साठी ‘डार्क मोड’चे अपडेट येण्याची शक्यता आहे. डार्क मोडमुळे रात्रीच्या वेळी मोबाईल वापरताना डोळ्यांना त्रास कमी होतो तसेच मोबाईलच्या बॅटरी लाईफवरही याचा चांगला परिणाम होतो.

त्याचबरोबर 3D टच अॅक्शन हे फिचर आयफोन युजर्ससाठी असणार आहे. या फिचरमुळे एखाद्याला न कळत त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहता येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी स्टिकरचे नवीन अपडेट आणल्यानंतर ते प्रचंड लोकप्रिय ठरले होते. व्हॉट्सअॅप आता लवकरच ‘स्टिकर इन्टिग्रेशन’ फिचर आणणार आहे. या फिचरमुळे युजर्सना स्टिकर पाठवण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरुन व्हॉट्सअॅपवर स्टिकर पाठवता येणार आहे.

सध्या व्हॉट्सअॅपवर ऑडिओ मेसेज पाठवायचा असल्यास तो रेकॉर्ड केल्यानंतर पाठवण्याआधी ऐकण्याची सोय नाही. या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरून एखादा ऑडिओ मेसेज पाठवताना रेकॉर्ड केल्यानंतर तो ऐकता येणार आहे. आपल्या मोबाईल फोनवरील ऑडिओ किंवा म्यूजिक फाईल्सची यादी अॅपमध्ये दिसेल. तसेच एकाच वेळी 30 ऑडिओ फाईल्स पाठवता येणार आहे.

Leave a Comment