ग्लोबल टॉप १०० ब्रांड मध्ये टाटाचा समावेश

taata
यंदाच्या वर्षात ब्रांड मूल्यात ३७ टक्के वाढ नोंदवून टाटा कंपनीने जगातील टॉप १०० ब्रांड कंपन्यात ८६ वा क्रमांक मिळविला असून या यादीत असलेली ही एकमेव भारतीय कंपनी आहे. लंडनच्या कन्सल्टन्सी ब्रांड फायनान्सने ही सूची नुकतीच जारी केली आहे. दरवषी अशी सूची जारी केली जाते. त्यानुसार मागच्या वर्षी ग्लोबल टॉप १०० मध्ये टाटा १०४ नंबरवर होती.

ब्रांड फायनान्सचे चीफ एग्झीक्यूटिव्ह डेविड हेग म्हणाले टाटा समूहाच्या ब्रांड व्हॅल्युत प्रभावशाली वाढ दिसून आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर म्हणाले, ग्लोबल टॉप १०० मध्ये आम्हाला मान्यता मिळाल्याने व्यवसाय जगतात सामाजिक जबाबदारीसह पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. कंपनीच्या ब्रांड व्हॅल्युत झालेली सुधारणा प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी मुळे झाल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment