अॅमेझॉन-फ्लिपकार्टला रिलायन्सच्या ‘या’ निर्णयामुळे बसणार फटका?

reliance
नवी दिल्ली – लवकरच ई-कॉमर्स सेक्टरमध्ये मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज एन्ट्री करणार असून अलीकडेच अहमदाबाद येथे पार पडलेल्या गुजरात व्हायब्रंट समिट ग्रुपमध्ये यासंबंधीची माहिती चेअरमेन मुकेश अंबानी यांनी दिली आहे. मुकेश अंबानी यांच्यानुसार लवकरच ई-कॉमर्स सेक्टरमध्ये रिलायन्स पाऊल ठेवणार आहे.

पण अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉलसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना मात्र रिलायन्सच्या या निर्णयामुळे जोरदार टक्कर मिळणार ऐवढे मात्र नक्की आहे. समिटमध्ये बोलताना अंबानी यांनी सांगितले होते, की देशभरातील रिटेलर्स पुढील १२ ते १८ महिन्यात रिलायन्सच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहेत. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला होता ज्यानुसार २०२७ पर्यंत भारतीय ई-कॉमर्स सेक्टरमध्ये ३० टक्क्यांनी वाढ होऊ शकते आणि या बाजाराची उलाढाल २०० बिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार.

आपल्या ई-कॉमर्समध्ये रिलायन्स गुजरातच्या १२ लाखाहून अधिक रिटेलर्स आणि स्टोर ओनर्सला जोडणार आहे. अशाप्रकारे कंपनी देशातील सर्वात मोठे रिटेल आधारित ई-कॉमर्स चेन तयार करणार आहे. रिलायन्सचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ ला एकासोबत इंटीग्रेट करणार जे ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेल सर्व्हिस प्रोवाईड करणार आहेत. देशात सध्या जवळपास २८ कोटी रिलायन्स जिओ युझर्स आहेत. कंपनी या सर्वांना जोडून एक नवी रिटेल चेन क्रिएट करू शकते. या व्यतिरिक्त रिलायन्स जिओचे देशभरात ४,००० हून अधिक रिटेल आउटलेट्स आहेत. येणाऱ्या काळात १०,००० पर्यंत रिटेल आउटलेट्सची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

देशात सध्या १०,००० हून अधिक रिलायन्स रिटेल स्टोर्स, भारतीय शहरात आणि गावांमध्ये ६,५०० हून अधिक आहेत. या व्यतिरिक्त जवळपास ५० वेअरहाऊस आहेत. सध्या लहान दुकानदार देशातील ९० टक्के रिटेल सामान विकतात. रिलायन्सया रिटेल दुकानदारांसोबत ई-कॉमर्सचा विस्तार करू शकतो. अलीकडेच नव्या FDI नॉर्मला केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे कोणतीही ई-कॉमर्स कंपनी १ फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रॉडक्टची एक्सक्लूसिव्हली विक्री करू शकणार नाही. या नियमाचा सर्वाधिक फटका अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉलसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला बसणार आहे. तर लोकल रिटेलर्सला या नव्या नियमामुळे फायदा होणार आहे.

आपल्या नव्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी रिलायन्स नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. समिटमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले होते, की ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Augmented Reality (AR), Holographs आणि Virtual Reality (VR) सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन शॉपिंगला आणखी आकर्षक बनवणार.

Leave a Comment