विकी कौशलच्या ‘उरी’चा ‘ह्या’ भाषेत बनणार रिमेक

vicky-kaushal
नुकताच अभिनेता विकी कौशलचा प्रदर्शित झालेला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी कौशलच्या या चित्रपटातील भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शंभर कोटीच्या क्लबमध्ये या चित्रपटाने एन्ट्रीदेखील केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर नऊ दिवसांच्या आत या चित्रपटाने ९१.८४ कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाचा दाक्षिणात्य भाषेत रिमेक बनणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कित्येक निर्मात्यांचे उरी चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला व आरएसवीपी प्रोडक्शन टीमला फोन आले आणि आपल्या भाषेत हा चित्रपट बनवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे उरी : द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटाचे अधिकार जास्त किमतीवर विकले गेल्यामुळे तामिळ, तेलगू व मल्ल्याळम भाषेत हा चित्रपट बनणार आहे.