स्विस सरकार भारताला माल्ल्याच्या बँक खात्यांची माहिती देणार

vijay-mallya
नवी दिल्ली – सीबीआय या भारतीय तपास यंत्रणेला भारतीय बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याच्या स्विस बँकांमधील खात्यांची आणि तीन कंपन्यांची माहिती देण्याचा निर्णय स्वित्झलँड सरकारने घेतला आहे.

माल्ल्याने स्वित्झलँडच्या सुप्रीम कोर्टातही सरकारच्या या निर्णयाविरोधात धाव घेतली होती, पण न्यायालयाने या खटल्यात स्विस सरकारच्या बाजूने कौल दिला. स्विस बँकेने ऑगस्ट २०१८ मध्ये माल्ल्याच्या विविध ठेवी गोठवल्या होत्या. २०१६ साली भारतातील विविध बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्ल्या लंडनला पळून गेला होता. लंडनच्या उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता. दरम्यान स्विस बँकेने ऑगस्ट २०१८ मध्ये माल्ल्याच्या विविध बँकांतील ठेवी गोठवल्यानंतर भारत सरकारला त्याच्या खात्यांची माहिती देण्याचा निर्णयही तेथील सरकारने घेतला. या निकालाला विरोध करत माल्ल्याने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. सध्या सीबीआय माल्ल्याचे प्रकरण हाताळत आहे.

Leave a Comment