शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि भाजपचे रणजित पाटील होणार व्याही

combo
मुंबई : शिवसेना आणि भाजपची येत्या लोकसभा निवडणुकीत युती अजून झालेली नाही. पण राज्यातील शिवसेना आणि भाजपच्या आमदारांच्या नात्यांची युती झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे मंत्री रणजित पाटील आता पारिवारिक सोयरिक जुळवणार आहेत.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव युवासेना सचिव पूर्वे़श सरनाईक यांचा विवाह भाजपचे आमदार आणि गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांच्या मुलीशी होणार आहे. नुकताच सरनाईक-पाटीलांमध्ये कौटूंबिक पद्धतीने सुपारीचा कार्यक्रम पार पडला. पूर्वेश सरनाईक हे ठाण्याचे नगरसेवक तसेच युवासेनेचे सचिव आहेत. पुढच्या महिन्यात फेब्रुवारीत साखरपुडा तर मे महिन्यामध्ये त्यांचा विवाह सोह़ळा पार पडणार असल्यामुळे भाजप शिवसेनेत अद्याप युती झाली नसली तरी त्यांच्या नेत्यांमध्ये ही अनोखी युती पाहायला मिळाली आहे.

Leave a Comment