प्रियंका गांधी या एक मानसिक रोगी; सुब्रमण्यम स्वामी बरळले

subramaniam-swami
नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रियंका गांधी-वॉड्रा यांना एक आजार असल्यामुळे केव्हाही त्यांचे मानसिक संतुलन बिघडू शकते, असे बेताल वक्तव्य केले आहे. राजकारणामध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सक्रिय प्रेवश केल्यानंतर अनेक राजकारणी व्यक्तींच्या प्रतिक्रिया येत आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनीही त्यांच्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

उत्तर प्रदेशची कमान प्रियंका गांधी यांच्या हाती दिल्यानंतर राजकीय पटलावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामींच्या प्रतिक्रियेची भर पडलेली दिसते. मात्र, त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे देशात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एक आजार प्रियंका गांधी यांना असून तो सार्वजनिक जीवनात उपयुक्त नाही. बायपोलारिटी असे त्याला म्हणतात, म्हणजेच या आजाराच्या व्यक्तीमध्ये हिंसाचाराचे लक्षणे दिसतात. या आजाराचा रुग्ण कोणालाही मारत सुटतो. त्यामुळे जनतेला माहिती हवे की त्यांचे मानसिक संतुलन केव्हाही बिघडू शकते, असे आक्षेपार्ह वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा काय परिणाम होतो, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment