एस.एस. राजामौलींच्या चित्रपटात झळकणार परिणीती चोप्रा

parineeti-chopra
अभिनेत्री परिणीती चोप्राची ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या आगामी चित्रपटात वर्णी लागली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे राजामौली हे आघाडीचे दिग्दर्शक आहेत. परिणीती त्यांच्या चित्रपटात काम करणार असल्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे.

राजामौलींचा आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारण्यासाठी परिणीतीचे नाव समोर येत आहे. मात्र, या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी परिणीतीने जास्त मानधन मागितल्याचेही बोलले जात आहे. तब्बल ३०० कोटी ऐवढे ‘आरआरआर’ या चित्रपटाचे बजेट आहे. हैदराबाद येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलिशान सेटही उभारण्यात आला आहे. या चित्रपटाच्या बारिक-सारीक गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. हा चित्रपट २०१९ मधील बीग बजेट चित्रपट मानला जात असल्यामुळे परिणीतीची या चित्रपटात कशी भूमिका असेल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

२०१८मध्ये परिणीतीने ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरासरी यश मिळाले होते. मात्र, २०१९मध्ये परिणीतीचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘पिंकी फरार’, ‘जबरिया जोडी’ आणि ‘केसरी’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जबरिया जोडीमध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर,’केसरी’मध्ये ती अक्षय कुमारसोबत झळकणार आहे.

Leave a Comment