गोर-गरीब मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार केतकी माटेगावकर

ketaki-mategaonkar
नांदेडमधील एका कार्यक्रमात केतकी फाऊंडेशनची स्थापना करणार असल्याची घोषणा मराठी सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकरने केली असून संपूर्ण नांदेडकरांमध्ये तिच्या या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे.

केतकी फाऊंडेशन गोर-गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे तिने सांगितले आहे. केतकीने उचललेल्या या पाऊलामुळे अनेकांना मदत होणारा आहे. तिने ही घोषणा नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केली आहे. केतकीला पाहण्यासाठी यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

तिने आपल्या चाहत्यांशी या कार्यक्रमामुळे संवाद साधला. चांगल्या दर्जाचे शिक्षण गरीब मुला-मुलीना मिळावे, यासाठी आपण काम करणार असल्याचे तिने सांगितले. केतकी फाऊंडेशन याच कामासाठी स्थापन करणार असल्याचे ती म्हणाली. केतकी माटेगावर ही एक पाश्वगायिका आहे. त्याचबरोबर ती एक उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मराठी चित्रपटांतून तिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात घर केले. आताही तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात तिचा दर्जा आणखी उंचावला आहे.

Leave a Comment