
बॉलिवूडमध्ये ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळख असलेली अभिनेत्री ईशा कोप्पीकरने आता राजकारणात प्रवेश केला आहे. तिने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तिने यानंतर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका मोठ्या पक्षात प्रवेश केल्याचा आनंद व्यक्त केला. भाजपसोबत जोडले जाणे ही खरच अभिमानाची गोष्ट असल्याचे यावेळी ईशाने म्हटले.
‘खल्लास गर्ल’चा भाजपमध्ये प्रवेश
षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन भाजपने केले यावेळी ती बोलत होती. यासोबतच, मी माझे काम नक्कीच चोखपणे करण्याचा प्रयत्न करेल, पण राजकारणात नवी असल्याने कधी बोलताना काही चूक झाली तर मला माफ करा, असेही तिने यावेळी म्हटले. कार्यक्रमाला यावेळी नितीन गडकरी यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उपस्थिती होती. आत्तापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये ईशाने भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्ग मोठा असल्याने याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
