फक्त बाळासाहेबांसाठी पहिल्यांदाच मिशी कापली – प्रविण तरडे

pravin-tarade
पहिल्यांदाच मिशी कापल्याचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी म्हटले आहे. फेसबुकवर ही पोस्ट तरडे यांनी शेअर केली आहे. खरंतर अनेकांना हे वाचून प्रश्न पडला असेल, की बाळासाहेबांसाठी तरडे मिशी का कापतील? पण या गोष्टीला कारणही तसेच आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारली. तर चित्रपटात कामगार नेते दत्ता साळवी यांची भूमिका प्रविण तरडेंनी साकारली आहे. दत्ताजी साळवी यांच्यासारखे दिसण्यासाठी तरडेंना मिशी कापणे गरजेचे असल्यामुळे, आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी पहिल्यांदाच त्यांनी आपली मिशी कापली.

आता तरडे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर फेसबुकवरून पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. पहिल्यांदाच मिशी कापली होती, फक्त बाळासाहेबांसाठी, असे कॅप्शन देत त्यांनी ठाकरेच्या सेटवरील नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत.

Leave a Comment