फेसबुकने फेटाळला निम्मी अकाउंट बनावट असल्याचा दावा

facebook
लंडन – फेसबुकचे १०० कोटी अकाउंट बनावट असल्याचा दावा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या एकेकाळीच्या वर्गमित्राने केला होता. फेसबुकने हा दावा हे नि:संशय खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे.

७० पानी ‘रिअॅलिटी चेक’ हा रिपोर्ट मार्क झुकेरबर्ग यांचा वर्गमित्र असलेल्या अॅरोन ग्रीनस्पॅन यांनी तयार केला आहे. हॉवर्ड विद्यापीठामध्ये अॅरोन आणि झुकेरबर्ग हे २००२ ते २००४ दरम्यान शिकत होते. फेसबुक २००४पासून त्यांच्या युजर्सच्या संख्येत फुगवटा आणत असल्याचा दावा अॅरॉन यांनी केला आहे. फेसबुकची ५० टक्के खाती बनावट असून त्यांची संख्या एकूण १०० कोटी असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये केला आहे.

आपणच फेसबुकची निर्मिती केली होती, असा त्यांनी धक्कादायक दावा रिपोर्टमध्ये केला आहे. पण त्यावरील मालकी ही तडजोड करून २००९ मध्ये सोडण्यात आल्याचे अॅरोन यांनी स्पष्ट केले. फेसबुक त्यांच्याकडील अकाउंटविषयी लोकांना खोटी माहिती सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचे सर्व दावे फेसबुकने फेटाळून लावले आहेत.

फेसबुकने आपल्या दुसऱ्या तिमाहीत काही वापरकर्ते दोन अकाउंट काढत असल्याचे म्हटले होते. असे वापरकर्ते हे महिन्याभरातील एकूण वापरकर्त्यांच्या संख्येच्या ६ टक्के आहेत. फेसबुकच्या एकूण अकाउंटपैकी ३ ते ४ टक्के बनावट असल्याची माहिती फेसबुकने अमेरिकेच्या सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला दिली आहे.

Leave a Comment