ब्राझीलमध्ये धरण फुटून 50 जणांचा मृत्यू, 345 बेपत्ता

dam-collapse
ब्रूमाडिनो – ब्राझीलच्या ब्रुमाडिनो शहरातील फिजायो लोह खाणीतील धरण फुटल्याने 50 जणांचा मृत्यू झाला तर 345 लाेक बेपत्ता झाले. बचाव पथकाने हेलिकॉप्टर व इतर साधनांच्या मदतीने 366 जणांचे प्राण वाचवले.
dam-collapse2ब्राझीलमधील मोठी कंपनी वेलची ही खाण आहे. ज्यावेळी हे धरण फुटले, त्यावेळी वेल कंपनीतील मजूर दुपारचे जेवण करत होते. धरणफुटीमुळे तयार झालेल्या चिखलात कँटीन दबली आहे, असे कंपनीच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.
dam-collapse1

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये धरणाच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली होती आणि धरण सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले होते, असं ते सांगतात.
dam-collapse3
कंपनीच्या माहितीनुसार, या श्रेत्रात अनेक नवीन धरण तयार करण्यात आले होते. ब्रुमाडिनो यातील एक होता. 1976 मध्ये तयार करण्यात आलेल्या या धरणाची क्षमता 20 लाख क्युबिक मीटर होती. ब्रुमाडिनो धरण तुटल्यामुळे मेनस जेराईस राज्यातील अनेक गावांत चिखल साचला आहे. आपत्तीग्रस्त गावांतील लोकांच्या मदतीसाठी टीम पाठवण्यात आली आहे,

Leave a Comment