न्यायाधीश गैरहजर राहिल्यामुळे अयोध्या वादावरील सुनावणी पुढे ढकलली

ayodhya
नवी दिल्ली – २९ जानेवारीला राम जन्म भूमी आणि बाबरी मशीदीवर होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मागच्या वर्षी संविधान पीठाची स्थापना या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी करण्यात आली होती. ही सुनावणी त्या पीठातील एक न्यायाधीश गैरहजर असल्यामुळे टाळण्यात आली आहे.

मागच्या वर्षी २५ जानेवारीला या प्रकरणावर सुनावणीसाठी ५ न्यायाधीशांची पीठ स्थापित करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोख भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नाजीर यांचा त्यामध्ये समावेश आहे. पण, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे २९ तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहणार असल्यामुळे ही सुनावणी टाळण्यात आली आहे.

१९८४ पासून इलाहबाद उच्च न्यायालायात अयोध्या राम जन्म भूमी आणि बाबरी मशीद यांच्या जमीन वादावर असलेल्या खटल्यावर सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालायाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यासाठी ५ न्यायाधीशांच्या संवैधानिक पीठाचे पुनःर्गठन केले आहे.

Leave a Comment