अपारशक्ती खुराणाची ‘एबीसीडी ३’ मध्ये वर्णी

aparshakti-khurana
प्रेक्षकांची मने ‘एबीसीडी’ चित्रपटाच्या मागील दोन्ही भागांनी जिंकली. आता लवकरच या चित्रपटांच्या जबरदस्त यशानंतर चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरूण धवनची मागच्या भागाप्रमाणेच यातही मुख्य भूमिका असणार आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

या चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणादेखील झळकणार आहे. याबद्दलची माहिती कोमल नाहटा यांनी फोटो शेअर करत दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे. डान्सवर आधारित हा चित्रपट असणार असल्याने या चित्रपटात अपारशक्ती कोणती भूमिका साकारणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्याने याआधी ‘दंगल’ आणि ‘स्त्री’सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. ‘एबीसीडी ३’ मध्ये वरूण धवन आणि श्रद्धा कपूरच्या मुख्य भूमिका असणार आहे. चित्रपटाबद्दल इतर माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Leave a Comment