अमेरिकेने अंतराळात बनवले पहिले आलिशान हॉटेल

space
वॉशिंग्टन – जगातील पहिले स्पेस हॉटेल अमेरिकेतील एका कंपनीने विकसित केले आहे. अंतराळात बनलेल्या या हॉटेलात जाऊन परतण्यासाठी 12 दिवस लागतील. सोबतच, तेथे फक्त 6 व्यक्तींच्या एकावेळी थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे हॉटेल 2021 मध्ये अंतराळात स्थापित केले जाणार आहे. सोबतच, ते 2022 पासून पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज होईल. फक्त हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या लोकांना या आलीशान हॉटेलात राहून परतण्याचे सौभाग्य मिळणार आहे. कारण, या स्पेस ट्रिपसाठी जाण्यास इच्छुक असलेल्यांना प्रत्येकी 67 कोटी रुपये खर्च येणार आहे.
space1
यात प्रवाशांना शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेता येईल. ऑरोरा स्टेशन असे नाव हॉटेलला देण्यात आले आहे. तसेच ओरायन स्पॅन नावाच्या कंपनीने याची स्थापना केली आहे. ओरायन स्पॅनचे संस्थापक आणि सीईओ फ्रँक बेंजर यांनी सांगितल्याप्रमाणे, सामान्य नागरिकांना अंतराळात पोहोचविण्याचा आमचा हेतू आहे. हॉटेलचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच ते अंतराळाच्या नियोजित कक्षात स्थापित केले जाणार आहे. या प्रवासात 12 दिवस सामान्य नागरिकांना अंतराळवीर असल्याचा अनुभव येणार आहे.
space2
बेंजर पुढे म्हणाले, स्पेसमध्ये असलेल्या हॉटेलात जाण्यापूर्वी कुठल्याही प्रवाशाला दोन वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. यात तीन महिन्यांचा ओरायन स्पेस अॅस्ट्रोनॉट सर्टिफिकेट कोर्स सुद्धा आहे. ऑरोरा स्टेशन पृथ्वीपासून 321 किमी दूर अंतराळात स्थापित केले जाणार आहे. 90 मिनिटांत हॉटेल पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. अर्थात यातील लोकांना 24 तासांत 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अशात अंतराळात स्वयंपाक नेमके कसे होईल आणि ते किती चविष्ट असेल यासंदर्भात चाचण्या सुरू आहेत.

Leave a Comment