आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंबाती रायुडूवर बंदी

ambati-rayudu
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने अंबाती रायुडूवर गोलंदाजी करण्यावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात रायुडूने गोलंदाजी केली होती. यावेळी त्याच्या शैलीबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. रायुडूला १४ दिवसांच्या आत गोलंदाजीची चाचणी द्यावी लागते. मात्र, या १४ दिवसांमध्ये रायुडूने आपल्या गोलंदाजीची चाचणी न दिल्याने त्याला बंदीला सामोरे जावे लागले आहे.

सध्या रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. मात्र, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळू शकणार आहे. तसेच बीसीसीआयची परवानगी घेतल्यानंतरच तो स्थानिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment