वेगवान एफ १८ रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस नावाने धावणार

vandebharat
देशातील सर्वात वेगवान एफ १८ रेल्वे सर्वप्रथम दिल्ली वाराणसी मार्गावर धावणार असून ही गाडी वंदे भारत एक्स्प्रेस नावाने सुरु होईल असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले आहे. ३० वर्षे जुन्या शताब्दी गाडीच्या जागी ही नवी ताशी १६० किमी वेगाने धावणारी मेड इन इंडिया रेल्वे आहे. गोयल म्हणाले या वेगवान गाडीसाठी अनेक नावे सुचविली गेली होती. पुढील आठवड्यात या ट्रेनला पहिल्या प्रवासासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखविला जावा असे पर्यंत सुरु असून त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला गेला आहे.

या गाडीला १६ कोच असून ती चेन्नईच्या कोच फॅक्टरी मध्ये बनविली गेली आहे. त्यासाठी ९७ लाख रुपये खर्च आला असून अवघ्या १८ महिन्यात भारतीय अभियंत्यांनी ही रेल्वे तयार केली आहे. या रेल्वेने वेगाचे रेकॉर्ड तोडले असून गेल्या महिन्यात कोटा सवाई माधोपुर मार्गावर घेतल्या गेलेल्या ट्रायल रन मध्ये ती ताशी १८० किमी वेगाने धावली आहे. ही संपूर्ण गाडी वातानुकुलीत आहे. दिल्ली वाराणसी हे ८०० किमी अंतर ती ८ तासात पार करेल.

एफ १८ ही भारताची पहिली इंजिनरहित ट्रेन आहे. १६ कोच पैकी दोन एक्झिक्युटिव चेअरकार, ३६० डिग्री मध्ये फिरू शकणाऱ्या सीट, अडव्हांस ब्रेकिंग सिस्टीम, दोन्ही बाजूला एरोडायनामिक डिझाईनची ड्रायव्हर केबिन अशी तिची अन्य वैशिष्टे आहेत. भारतातच बनविली गेल्याने तिच्या निर्मितीचा खर्च कमी झाला आहे असेही समजते.

Leave a Comment