केवळ ७ मिनिटात इंडोनेशिया मास्टर्स बनली सायना नेहवाल

saina
रविवारी इंडोनेशिया मास्टर्ससाठी महिला एकेरीत झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या साईना नेहवालला सामना पूर्ण न खेळतच विजेती घोषित करण्यात आले. स्पेनच्या कॅरोलिना मारीन आणि सायना यांच्यात झालेल्या या सामन्यात ७ मिनिटे खेळ झाल्यावर मारीनने दुखापत झाल्याने सामना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे साईनाला विजेती घोषित केले गेले. हा खिताब मिळविणारी सायना पहिली भारतीय खेळाडू आहे. गेल्या दोन वर्षात पहिले बीडब्ल्यूएफ खिताब तिने स्वतःचा नावावर केला आहे.

साईना सध्या जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानावर आहे तर मारीन पहिल्या स्थानावर आहे. सामना सुरु झाल्यावर पहिल्या सात मिनिटात मारीनचा पाय सर्व्हिस घेताना दुखावला. त्यानंतर तिने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. पहिल्या गेममध्ये साईना ४ -१ ने पिछाडीवर होती.

साईनाने मारीनला सामना सोडवा लागल्याबद्दल खेद व्यक्त केला. ती म्हणाली मीही वारंवार दुखापतीतून जाते आहे. मात्र त्यातून किती बाहेर आले आहे याची चाचणी घेण्यासाठी मी सामने खेळते आहे. माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. सायनाने मागचे बीडब्ल्यूएफ विजेतेपद २०१७ मध्ये मलेशियात मिळविले होते.

Leave a Comment