पद्मश्रीमुळे नर्व्हस पण चांगल्या अर्थाने दबाव वाटतोय- सुनील खेत्री

sunilkh
भारतीय फुटबॉल टीम चा कप्तान सुनील खेत्री याने पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना नर्व्हस वाटत असल्याचे सांगितले. तो म्हणाला पद्मश्री मिळाल्याचा आनंद खूप आहे पण त्यामुळे आता माझ्यावरची जबादारी वाढली आहे आणि त्या जबादारीमुळे थोडे नर्व्हस वाटते आहे. मी अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे याचे दडपण जाणवते आहे.

सुनील खेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो नंतर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. सुनील म्हणाला शनिवारी पद्मश्री मिळाली पण तिचा अनुभव घेण्यास थोडा वेळ हवा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही दोष असतात तसे ते माझ्यातही आहेत. ते सुधारणे आणि चांगला माणूस बनणे हे माझे कर्तव्य आहे. मी दुसऱ्या खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करायला हवा याची जाणीव आहे. यामुळेच पद्मश्री मिळाल्याचा दडपण आले आहे. अर्थात हे दडपण मी चांगल्या अर्थाने घेत आहे. सुनील पद्मश्री मिळालेला ६ वा फुटबॉलपटू आहे.

Leave a Comment