हिटलरच्या मालकीच्या पुस्तकात होता अमेरिकेत नरसंहार करण्याचा आराखडा!

Hitler
अॅडॉल्फ हिटलरच्या संग्रहात असलेल्या एका दुर्मिळ पुस्तकात जर्मनीप्रमाणेच उत्तर अमेरिकेतही नरसंहार करण्याचा आराखडा दिला होता. कॅनडाच्या राष्ट्रीय संग्रहालयाने गेल्या वर्षी मोठी किंमत देऊन हे पुस्तक विकत घेतले होते. त्यात ही योजना तपशीलाने दिली आहे.
Hitler1
लायब्ररी अँड अर्काईव्हज् कॅनडा या राष्ट्रीय ग्रंथालयाने गेल्या वर्षी 4,500 डॉलर किंमत मोजून हे पुस्तक विकत घेतले होते. रविवारी असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉलोकॉस्ट (ज्यूंचा नरसंहार) दिनानिमित्त बुधवारी हे पुस्तक पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले.

“स्टॅटिस्टिक्स, मीडिया अँड ऑर्गेनाइजेशन्स ऑफ ज्यूअरी इन द युनायटेड स्टेट्स अँड कॅनडा” असे या पुस्तकाचे नाव असून ते 137 पानांचे आहे. जर्मन भाषाशास्त्रज्ञ आणि संशोधक हेन्झ क्लोस यांनी ते 1944 मध्ये संकलित केले होते. नाझी राजवटीत राष्ट्रीयत्वासारख्या विषयांवर संशोधन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि अमेरिका हा त्यांचा खास विषय होता.

नाझी जर्मनीने अमेरिका आणि कॅनडावर यशस्वी हल्ला केला असता तर तेथे ज्यूंचा नरसंहार करण्यासाठी या पुस्तकाने महत्त्वाची भूमिका बजावली असती, असे या पुस्तकाचे जतन करणाऱ्या जेकब एम. लोवी कलेक्शनचे क्यूरेटर मायकेल केंट यांनी सीएनएन वाहिनीला सांगितले.

हा अहवाल अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगून केंट म्हणाले, की त्यात मोठी यहूदी लोकसंख्या असलेल्या केवळ टोरोंटो आणि विनिपेग, मॅनिटोबा अशा मोठ्या शहरांचीच नव्हे तर छोट्या शहरांचीही माहिती आहे.

Leave a Comment