मंडोवीवरील तिसऱ्या पुलाला पर्रिकरांचे नाव द्या – गोव्यातील तमिळ संघटनेची मागणी

Manohar-Parrikar
गोव्यातील मंडोवी नदीवरील तिसऱ्या पुलाला मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी गोवा तमिळ संगम या संघटनेने केली आहे. संघटनेने या संदर्भात केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.

“मंडोवी नदीवरील नवीन पुलाला ‘श्री. मनोहर पर्रिकर पूल’ हे नाव द्यावे, हा आम्हा गोव्यातील तमिळ जनतेचा प्रस्ताव आपण मान्य करावा, अशी आम्ही विनंती करतो. महान द्रष्टे नेते असलेल्या आमच्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या चांगल्या पायाभूत सुविधांचे आणि विकासाचे कार्य गोव्यातील बहुतेक लोकांना आवडले असून त्यांच्या ते लक्षात आहे,” असे संघटनेने म्हटल्याचे यूएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

पक्षाच्या आणि राजकीय संबंधांच्या पलीकडे गोव्यातील बहुतेक लोकांना पर्रिकर आवडतात आणि त्यांच्या तीव्र आजारपणातून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. आरोग्य प्रतिकूल असतानाही ते गोव्याच्या पायाभूत विकासाचा विचार करून त्यावर कार्य करतात. ही ईश्वराचे गोव्याला वरदान आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment