ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने नाकारला पद्मश्री

geeta

भुवनेश्वर –   केंद्राने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्मश्री’ आणि ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा केली होती. मात्र,  ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची बहीण गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. गीता मेहता यांनी हा सन्मान नाकारला आहे.

गीता मेहता म्हणाल्या की, ‘भारत सरकारने मला पद्मश्री पुरस्कारासाठी योग्य समजले याबद्दल मला अत्यंत आदर आहे. मात्र, मी आदरपूर्वक हा पुरस्कार नाकारते. कारण, आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. म्हणून पुरस्कार स्वीकारणे योग्य ठरणार नाही’.

Leave a Comment