धोनीची जोरदार फटकेबाजी, भारताचे न्यूझीलंडसमोर 325 धावांचे आव्हान

ms

माऊंट माऊंगानुई – न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने किवी संघासमोर 325 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी करत चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कोहली आणि रायुडूनेही चांगली फलंदाजी केली पण त्यांची दोघांचीही अर्धशतके हुकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 324 पर्यंत पोहोचवली. धोनीला सलग चौथ्या वन डे सामन्यात अर्धशतकी खेळी साकारण्यात अपयश आले, परंतु त्याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने टीकाकारांची बोलती बंद केली.

कर्णधार कोहली बाद झाला त्यावेळी भारताच्या 39.1 षटकांत 3 बाद 236 धावा होत्या. त्यानंतर धोनीने सुरुवातीला रायुडू आणि नंतर जाधवसह भारताच्या धावासंख्येचा वेग कायम राखला. त्याने 33 चेंडूंत नाबाद 48 धावा केल्या आणि त्यात 5 चौकार व 1 षटकार यांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावली होती. धोनीचा खेळ संथ झाला अशी ओरड मारणाऱ्या टीकाकारांना धोनीने आपल्या कामगिरीनेच उत्तर दिले.

 

Leave a Comment