सिटाडेलचे मालक केनेथ ग्रीफिनने खरेदी केले अमेरिकेतील महागडे घर

grifin
लंडनच्या बकिंघम पॅलेसजवळ ८७० कोटींचे घर खरेदी करून चर्चेत आलेल्या सिटाडेल या कंपनीचे मालक केनेथ ग्रीफिन पुन्हा एकदा महागड्या घरखरेदीने चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यूयॉर्क सेन्ट्रल पार्क साउथ मधील सर्वात महागड्या इमारतीत १७०० कोटी रुपये खर्चून पेंटहाउस खरेदी केले आहे. हे अमेरिकेतील सर्वात महाग घर असल्याचे सांगितले जाते. हे पेंटहाउस १ हजार फुट उंचीवर आणि २४ हजार चौरस फुट रुंद आहे. या घरात ग्रीफिन न्यूयॉर्कमध्ये असतील तेव्हा वास्तव्य करतील असे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

kenetth
ग्रीफिन यांना महाग घरे खरेदी करण्याचा शौक आहे. त्यांनी अत्तापार्यात कोट्यावधीच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ते फ्लोरिडाचे रहिवासी असून त्यांनी १९९० साली सिटाडेलची स्थापना केली. जगातील ५०० श्रीमंत व्यक्तीत त्यांचा समावेश आहे. त्यांची एकूण मालमत्ता ६८ अब्ज ३० कोटींची आहे.

त्यांनी रॉबिनहूड फौंडेशन तसेच बिल आणि मेलिंडा गेट फौंडेशनसाठी मोठ्या देणग्याची दिल्या आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी वाल्डोर्फ अॅस्टेरिया हॉटेलचे दोन मजले २ अब्ज १३ कोटींना, मिआमी बीच पेंटहाउस ४ अब्ज २६ कोटींना, शिकागो मधील सर्वात महाग घर, ४ मजली पेंटहाउस ४ अब्ज १७ कोटीना खरेदी केले आहे. त्यांनी पाम बीच, फ्लोरिडा येथे ही महागड्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत.

Leave a Comment