फक्त येथेच लावले जातात तीन तिरंगे

sansad
प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज हा त्या त्या देशाचा मानबिंदू असतोच. आपला तिरंगा भारतीय नागरिकांचा असाच एक मानबिंदू. त्याच्या सन्मानासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून ते वीर जवानांपर्यंत सर्व प्राणार्पण करण्यास तयार असतात. आज आपण गणतंत्र दिवस साजरा करत आहोत आणि देशभर सर्वत्र त्यानिमित्ताने ध्वजारोहण केले जाईल. अर्थात अश्यावेळी ध्वज संहितेनुसार एका जागी एकच तिरंगा फडकाविला जातो. मात्र आपल्या देशात अशी एकमेव जागा आहे कि जेथे ३ ध्वज लावले जातात आणि ती जागा आहे आपली संसद.

रांची येथील पहाडी मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे जेथे भगव्या अथवा लाल पताकेऐवजी तिरंगा लावला जातो. हा देशातील सर्वात उंच ध्वज असून तो ४९३ मीटर उंच आहे. फ्लॅग कोड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय ध्वज संहितेनुसार तिरंगा सुती, रेशमी अथवा खादीच्या कपड्यापासून बनविला गेला पाहिजे. प्लॅस्टिक पासून तो बनविला जाता कामा नये.

तिरंगा फडकविताना त्याचा एकही भाग जमिनीला स्पर्श करता कामा नये. कारण तो देशाची शान आहे आणि त्यामुळे नेहमी उंच असला पाहिजे. भारतात तिरंगा बनविण्याचा अधिकृत परवाना हुबळी येथील एका उत्पादकाला आहे. हुबळी हे कर्नाटकातील शहर आहे.

Leave a Comment