प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका भारतरत्न

ratna
देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न साठी यंदा तीन महान व्यक्तींची निवड झाली असून त्याची घोषणा शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली यंदा हा सन्मान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ग्रामीण भारतासाठी मोठे योगदान देणारे नानाजी देशमुख आणि महान गीतकार भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या महान व्यक्तींचे अभिनंदन केले आहे.

नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. नानाजी देशमुख यांनी ग्रामीण भारतासाठी मोठे योगदान दिले आहे तर प्रणबदा यांनी विनास्वार्थ देशसेवा केली आहे. ते कॉंग्रेसचे नेते आहेत आणि माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केले आहे. भूपेन हजारिका हे आसामचे गीतकार आणि संगीतकार असून त्यांच्यामुळे भारतीय संगीत संपूर्ण जगात पोहोचले. त्यांच्या गीतांमुळे आणि संगीतामुळे पिढ्यानपिढ्या लोकांना आनंद मिळाला. भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेई हजारीकांच्या गीतांचे चाहते होते.

या पुरस्काराबद्दल प्रणब मुखर्जी यांनी आनंद व्यक्त केला आहे तर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment