शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण

purandare
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे संशोधन करण्यात अवघे आयुष्य व्यतीत केलेले आणि शिवशाहीर म्हणून केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध असलेले बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण या सन्मानाने गौरविले गेले असून त्याची घोषणा शुक्रवारी सायंकाळी केली गेली. पुरंदरे यांनी इतिहास संशोधनात महत्वाचे योगदान दिले असून शिवाजी महाराज हेच त्यांचे जीवन बनून राहिले आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती पुस्तकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला असून जाणता राजा या नाटकाचे हजारो प्रयोग झाले आहेत.

पद्मपुरस्काराबद्दल बोलताना बाबासाहेब पुरंदरे यांनी आनंद व्यक्त केलाच पण हा पुरस्कार केवळ सन्मान नसून मी गेली ५० वर्षे करत असलेले काम सुरु ठेवण्यासाठी मिळालेली प्रेरणा आहे असे सांगितले. ते म्हणाले या पुढे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित आयुष्य शिवकालीन इतिहासाच्या संशोधनात घालविणार आहे.

बाबासाहेब यांनी महाराष्ट्रात गडसंवर्धन आणि शिवकालीन इतिहास संशोधन यासाठी मोठे योगदान देले आहेच पण त्यांनी शिवाजी महाराजांवर दिलेल्या व्याख्यानमालानी प्रचंड लोकप्रियता मिळविली आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला शिवाजी राजांची महती पटवून दिली आहे.२०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविले गेले आहे.

Leave a Comment