अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी प्रथमच देवोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हजेरी लावून अनेक राष्ट्राध्यक्ष आणि जगातील प्रमुख कंपनी सीइओची भेट घेऊन चर्चा केली आहे. ट्विटर त्यासंदर्भात आलेल्या पोस्टनुसार कुक यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जेईर बोल्सानोरा यांच्या बरोबर डिनर घेतले. मायक्रोसॉफ्टचे सीइओ सत्या नडेला यावेळी उपस्थित होते.
अॅपलच्या टीम कुकची प्रथमच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हजेरी
ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सानोरा त्यांच्या नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी २०१३ मध्ये त्यांचा मुलगा अॅडीक्ट झाला तरी चालेल पण गे असण्याला मान्यता देणार नाही असे सांगितले होते आणि कुक यांनी २०१४ साली सार्वजनिक रित्या ते गे असल्याची कबुली दिली होती.
कुक यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पतीयान यांची भेट घेतली तसेच दुबईचे क्राऊनप्रिन्स शेख हमदान बिन महम्मद अल मक्तूम यांचीही भेट घेतली. ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यानाही ते भेटले.