आधारकार्डमध्ये आता कोणत्याही त्रुटी नाही – नंदन नीलेकणी

nanadan-nelkeni
दावोस – सुरुवातील आधारकार्डमध्ये अनेक अडचणी होत्या. पण त्या त्रुटी आता दुर करण्यात आल्या असून सर्व काही सुरळीत असल्याचे इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी म्हटले आहे. नीलकेणी दावोसमध्ये आयोजित आर्थिक मंच वार्षिक बैठक २०१९ मध्ये ‘डिजिटल दुनिया मे पहचान’ या विषयावरील चर्चेत बोलत होते.

आधार कार्ड आकडे जोडण्याचे साधन नाही. ओळखपत्र प्रदान करणे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो की नाही, हे तपासणे आधारकार्डचे काम आहे. भारतीय ओळख प्रणालीला आधार म्हटले जाते. २००६ मध्ये हा विचार आला. यामागे अनेक कारणे होती. नोकरीसाठी शहरात जाणारे लोक, मुलांचा जन्माचे दाखले नसणे तसेच ज्यांच्याकडे ओळखीसाठी कुठलेच कागदपत्रे नाहीत अशांना मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील हेतू होता, असेही नीलेकणी म्हणाले. सरकारी योजनांतील बराच पैसा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत संपून जातो. त्यामुळे डिजिटल ओळखपत्रांच्या माध्यमातून हे थांबविता येऊ शकते, हे समजल्यानंतर आधारची सुरुवात झाली असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment