हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलवरील बंदी बीसीसीआयने उठवली

combo
मुंबई – हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर बीसीसीआयेन ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे निलंबनाची कारवाई केली होती. याबाबत निर्णय घेताना बीसीसीआयने आरोप सिद्ध न झाल्यामुळे बंदीची शिक्षा मागे घेतली असल्यामुळे हार्दिक पांड्या न्यूझीलंड दौऱ्यात उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात दाखल होवू शकतो.

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर बीसीसीआयची प्रशासकीय समितीने अनिश्चित काळासाठी बंदी घातली होती. आता, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावरील बंदी मागे घेतली आहे. बीसीसीआयमध्ये लोकपालची नियुक्ती झाल्यावरच आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. बीसीसीआयने जाहीर केले, की या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या समितीतील पीएस नरसिम्हा यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये वादग्रस्त विधाने केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेला हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना आता पुनरागमन करता येणार आहे. त्यामुळे निवड समिती आता न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित ४ एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांसाठी त्यांना संधी संघात घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment